breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरातील सर्व रुग्णालयाच्या अडीअडचणीवर बैठक लावणार – महापाैर राहूल जाधव

पिंपरी –  महापालिकेच्या सर्व रुग्णालयातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य वैद्यकीय सुविधा चांगल्या मिळाव्यात, याकरिता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह सर्व रुग्णालयातील डाॅक्टरांची बैठक घेवून अडीअडचणी जाणून घेतल्या जातील, तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महापाैर राहूल जाधव यांनी दिली.  

महापौर जाधव यांनी आज (शुक्रवारी) दुपारी बाराच्या सुमारास वायसीएमएच् रुग्णालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, ‘इ’ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेविका नम्रता लोंढे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारिका लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमएचचे वैद्यकीय आधीक्षक डॉ. मनोज देशमुख उपस्थित होते. महापौर जाधव यांनी तळमजल्यावर असलेल्या प्रसुती कक्षाची पाहणी केली. प्रसूत झालेल्या महिलांना मुबलक प्रमाणात सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button