breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील अनधिकृत 29 फलकांवर कारवाई

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण पथकाने अनधिकृत फलकांवर आज (सोमवारी) कारवाई केली. यामध्ये विविध 29 अनधिकृत फलक काढण्यात आले.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील अनधिकृत फलक काढण्यात आले. त्यामध्ये मोरवाडी नाना-नानी पार्क येथील तीन, चिंचवड स्टेशन दोन, बंटी चौक दोन, म्हाळसाकांत चौक चार, लोकमान्य हॉस्पिटल दोन, भेळ चौक दोन, काचघर चौक एक, संभाजी चौक चार, आकुर्डी स्टेशन चार आणि आनंद हॉस्पिटल परिसर पाच असे एकूण 29 अनधिकृत फलक काढण्यात आले आहेत.  दरम्यान, आकाशचिन्ह विभागाच्या सर्व्हेत शहरात 881 फलक अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यातील 200 जणांना अडीच पट दंडाच्या नोटीसा पाठवल्या आहेत. तर, उर्वरीत फलकधारकांना नोटीसा पाठविण्याचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button