शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी सायंकाळी बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1-6.jpg)
पिंपरी – निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. विविध दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सायंकाळी बंद तर शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रावेत पम्पिंग स्टेशनमधील विद्युत विभागाची तातडीची आवश्यक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे गुरुवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी एकवेळेस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून घ्यावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांनी दिली.