breaking-newsपिंपरी / चिंचवड

शनिवारी 344 जणांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. या काळात घराबाहेर पडून लॉकडाऊनचे नियम मोडणा-या 344 जणांवर प्रतिबांधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. दहा दिवसांचा कठोर लॉकडाऊन झाल्यानंतर प्रशासनाने काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कारवाईचा आकडा देखील खाली आला आहे. नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तुंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तरी, विनाकारण घराबाहेर पडणा-या नारिकांना पोलिसांनी वेळीच चोप दिला आहे.

शनिवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार पोलीस ठाणेनिहाय कारवाई केली आहे. त्यानुसार एमआयडीसी भोसरी (47), भोसरी (16), पिंपरी (18), चिंचवड (22), निगडी (34), आळंदी (0), चाकण (0), दिघी (32), म्हाळुंगे चौकी (10), सांगवी (31), वाकड (13), हिंजवडी (23), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (21), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (59), रावेत चौकी (3,) शिरगाव चौकी (8).

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button