breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
व्यायाम हि आजच्या काळाची गरज – महापौर माई ढोरे
![Allow the corporation to purchase covid vaccine directly from the manufacturer; Letter from Mayor Mai Dhore to Health Minister Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Usha-Dhore.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
नवीन वर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षात आरोग्य उत्तम राखणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी जिम, योगा गरजेचे असल्याचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.
पिंपळे निलख येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाबाजी पांडु भांडे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण सोहळा तसेच पिंपळे निलख विशालनगर येथील नागरीकांसाठी समस्या ॲप चे उद्दघाटन सोहळा म हापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नगरसेवक तुषार कामठे, आरती चोंदे आदीसह प्रभागातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.