वीज गेल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ, महापोर्टल परीक्षेचा पिंपरी-चिंचवडमध्ये उडाला फज्जा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/8-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवडमध्ये महापोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आहे. हिंजवडी इथल्या परीक्षा केंद्रावर अचानक वीज गेल्यान परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट येथे हा प्रकार घडला. पाठ्यपुस्त महामंडळाच्या लिपीक पदासाठी आज महापोर्टलकडून परीक्षा घेतली जात आहे.
ही परीक्षा सकाळी दहा वाजता सुरु झाली. दोन तासांच्या या परीक्षेत पहिल्या अर्ध्या तासातच वीज गेली अन् एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बाहेर काढलं, असा आरोप होत आहे. तर काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पेपर लीक केल्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढचा पेपर याच केंद्रावर दुपारी एक वाजता सुरु होणार आहे.
त्यामुळे वीज गेल्याने महापोर्टल परीक्षेचा फज्जा उडाला आहे. सर्व कम्प्युटर बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ केला. आता पोलिसांनाही बोलावल्याची माहिती मिळत आहे. “व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती दिलेली नाही. पीसी का बंद केले, कोणत्या उपाययोजना केल्या, बॅकअप ब्लॅनची कल्पना दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे. पेपर न देता बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.