विशालनगर-पिंपळे निलख येथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG-20181022-WA0018.jpg)
पिंपरी। विशालनगर-पिंपळे निलख येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा ११ वा वर्धापन दिन विद्या विनय निकेतन शाळेच्या क्रीडांगणावर रविवारी (दि.२१) उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक यांनी केले. वार्षिक अहवालाचे वाचन संध्या विद्यासागर यांनी केले. तसेच, वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्या भाईदास पाटील, अच्युत पेठे, रमेश भांगे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड उपस्थित होत्या.
यावेळी वार्षिक अहवालाचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका आरती चौंधे यांच्याहस्ते करण्यात आले. डॉ. पंडित विद्यासागर यांनी ‘बदलती परिस्थिती आणि ज्येष्ठ नागरिक’ या विषयावर व्याख्यान दिले. तसेच, परिस्थितीनुसार ज्येष्ठ नागरिकांनी कसे बदलले पाहिजे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार उषा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मीता आपटे, सुनंदा कुलकर्णी, अजित धामणकर, पुरूषोत्तम दोमकुंडवार यांनी काम पाहिले.