breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘विलास लांडेचं आणि इंदापूरकरांचं काय नातं हाय, कुणास ठाऊक’ ! अजित दादांनी भर सभेत लावला डोक्याला हात

  • इंदापूरच्या सभेत अजित दादांना आला विलास शेठचा फोन
  • 10 मीनिटं कमी असताना फोन करतोय… म्हणताच सभेत पिकला हास्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसची सभा सुरू असताना अजित पवार यांना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा फोन आला, आणि सभेत हाशा पिकला. या फोनवरून अजित दादांनी देखील विलास शेठची चांगलीच खिल्ली उडवली. विलासचं आणि इंदापूरकरांचं काय नातं आहे, काय माहीत?. नेमकं इंदापूरमध्ये आलं की त्याचा फोन येतो, असे म्हणताच सभेत शिट्ट्या सुरू झाल्या.  

इंदापूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी जाहीर सभेत अजित दादा भाषण करत होते. भाषण रंगात आलेलं असतानाच दादांचा फोन खनाणला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा फोन असल्याची चिट्टी स्वीयसहायकाने त्यांना दिली. त्यावर दादांनी देखील भर सभेत विलास शेठची खिल्ली उडवली.  

अजित दादा म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरायला 10 मीनिटं बाकी आहेत. आणि आता फोन करतोय. इतके दिवस कोणी अडवलं होतं?. पुन्हा मुळ मुद्याचं भाषण सुरू झालं असताना नागरिकांनी पुन्हा शिट्ट्या सुरू केल्या. तेवढ्यात दादांनी सुध्दा पुन्हा तोच विषय घेतला. “या विलसचं आणि इंदापूरकरांचं काय नातं आहे कुणास ठाऊक, नेमकं इंदापूरमध्ये आलं की त्याचा फोन येतो”. पाठीमागे मार्केट कमिटीमध्ये माझी सभा होती. सभा सुरू असतानाच नेमका त्याचा फोन आला. “आम्ही काय तरी बोललो आणि ते सगळ्या महाराष्ट्रात झालं”, असे म्हणताच नागरिकांनी शिट्ट्या वाजवायला सुरूवात केली.

अजित दादा पुढे असे म्हणाले की, मार्केट कमिटीच्या सभेत विलासरावचा फोन आला तेव्हा आम्ही बोललो त्याची महाराष्ट्रात चर्चा झाली खरी. पण, त्यावेळी हाच दत्ता भरणे विजयी झाला. आता देखील विलासचा फोन आला, आता देखील हा पट्ट्या विजयी झाला, असे बोलत असताना दादांनी भरणे यांच्याकडे पाहत खुनावले. शेवटी राष्ट्रवादी पुरस्कृत अर्ज भरू का अशी विचारणा विलास लांडे यांनी केली होती. तुला काय करायचेय ते कर, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर त्याला राष्ट्रवादी पुरस्कृत अर्ज भर म्हणावं, असेही दादांनी व्यासपीठावरून आपल्या स्वीयसहायकाला सांगितले.     

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button