breaking-newsपिंपरी / चिंचवड
विलगीकरण केलेल्या नागरिकांना युवासेनेकडून आवश्यक साहित्य वाटप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी पालिकाने विलगीकरण केलेल्या लोकांना पिंपरी युवासेनेकडून मास्क व अत्यावश्यक साहित्य वाटप केले.
गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन आहे. या परीस्थितीमुळे अनेक मोल-मजुरी करणार्या गरीब, विस्थापित नागरिकांची सोय महापालिकेने दापोडी येथील शाळेत केली आहे.
आज पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिलांकडून त्यांना मास्क आणि अत्यावश्यक साहित्य दिले.
यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिलाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची, गोरख नेटके उपस्थित होते.