breaking-newsपिंपरी / चिंचवड

विलगीकरण कक्षातील रुग्णांना उत्तम आहार मिळत नसल्याच्या तक्रारी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असून हजारो रुग्ण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्यांना उत्तम आहार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तरी, महापालिकेने विलगीकरण कक्षातील रुग्णांची योग्य ती काळजी घ्यावी. त्यांना पोषक आहार द्यावा. गरज पडल्यास शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करावा, अशी सूचना माजी महापौर राहूल जाधव यांनी केली आहे.

विलगीकरण कक्षातून रुग्णांच्या आहाराचे योग्य नियोजन होत नाही, असे लक्षात आले आहे. त्यासबंधीत अनेक तक्रारी आल्या आहेत. तरी सर्व रुग्णांना उत्तम दर्जाचा आहार देण्यात यावा, तसेच रुग्णांचे मानसिक संतुलन सकारात्मक राहण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. सबंधीत वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णांची व्यवस्थित काळजी घ्यावी. गरज पडल्यास शहरामध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करावा, अशी सूचना माजी महापौर जाधव यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button