breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभेसाठी मनसेच्या सहा इच्छुकांनी दिल्या मुलाखती

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकूण सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. बुधवारी (दि. 25) मुंबईत या मुलाखती घेण्यात आल्या.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून मनसेचे युवकाध्यक्ष हेमंत डांगे, शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी मुलाखत दिली आहे. भोसरी मतदार संघासाठी शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते सचिन चिखले आणि विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी मुलाखत दिल्या आहेत. तर, पिंपरी विधानसभेसाठी के. के. कांबळे आणि राजू भालेराव यांनी मुलखत दिली आहे. यातील कोणाला उमेदवारी मिळणार हे येणा-या काळात स्पष्ट होणार आहे.

मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button