breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी 6 जुलैपर्यंत अर्ज करावेत

  • शहराध्यक्ष सचिन साठे यांची माहिती

पिंपरी, (महाईन्यूज) – विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी छापील उमेदवारी अर्ज संत तुकारामनगर, पिंपरी येथील शहर कॉंग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत. या अर्जासोबत सर्वसाधारण वर्गातील उमेदवारासाठी पंधरा हजार रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी दहा हजार रुपये पक्षनिधी म्हणून डीडीव्दारे प्रदेश कार्यालयाकडे जमा करावा, अशीही माहिती प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून सरचिटणीस ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button