breaking-newsपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांसाठी अग्नीशामक विभागाकडून बचावात्मक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्नीशामक विभागाकडून थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रात्यक्षिके करण्यात आली. अचानक लागलेल्या आगीमुळे बचावात्मक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.

या प्रात्यकक्षिक सादरीकरणाच्‍या कार्यक्रमात सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहा. पोलिस निरिक्षक, पी. एन. चौगुले, एस. जी. रनवरे, सब ऑफिसर अरविंद गुळींग, सौरभ गिरकर, ए. बी. परब, सुर्यकांत मठपती, फारमन मनोज मोरे, मिलिंद पाटील, भुषण येवले, भाईदास लांडगे, दिलीप गायकवाड वाहनचालक राजाराम लांडगे, अमोल रांजणे, शुभम काळे आदी उपस्थित होते.

इमारतीला आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेच्या इमारतीबाहेर कशा
प्रकारे बाहेर काढले पाहिजे, त्याच बरोबर शिक्षक आणि इतर इमारतीमधील स्टाफ
यांनी सुरक्षित पणे इमारतीबाहेर कसे पडावे, याबाबतची माहिती व प्रात्याक्षिके करुन
दाखवण्यात आली. तसेच छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीचे शमन कसे करायचे याचे
प्रत्याक्षिक आग विझविण्याचे नायट्रोजन सिलेंडरद्वारे शाळेतील अध्यापक व अध्यापिका
यांचेकडून अग्निशामक विभागाच्या दलाने करुन घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button