breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहनतळाची आरक्षणे ताब्यात नसताना “पार्किंग पॉलिसी” कशासाठी?

  • महापालिकेत पार्किंग पॉलिसीचे सादरिकरण
  • विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केले आरोप

पिंपरी – महापालिकेने अधी नागरिकांना मुलभूत सुविधा द्याव्यात. त्यांना वेठीस धरून अनावश्यक प्रकल्प त्यांच्यावर लादू नयेत. आज शहरात सार्वजणिक प्रवासी व्यवस्था सक्षम नाही. वाहनतळाची 89 आरक्षणे पालिकेच्या ताब्यात नाहीत. अशी अवस्था असताना पार्किंग पॉलिसी करण्याचा घाट कशासाठी, अशा शब्दात नगरसेवकांनी सत्ताधा-यांवर आरोप करून पार्किंग पॉलिसीला विरोध केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘पार्किंग’ पॉलिसीचे धोरण तयार केले आहे. या धोरणाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महासभेत घेतला जाणार आहे. महासभेसमोर हे धोरण मान्यतेसाठी ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसाठी पार्किंग पॉलिसीचे शुक्रवारी (दि. 15) महापालिकेत सादरिकरण ठेवले होते. यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षांनी देखील विविध प्रश्न उपस्थित करत पॉलिसीला विरोध दर्शविला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमएपीएमलच्या अध्यक्षा नयना गुंडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह नगरसेवक, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पीएमएपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. पीएमपीएमएलसाठी बस थांबे नाहीत. सुविधांची कमतरता आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सह शहर अभियंता राजन पाटील यांनी ‘पार्किंग’ पॉलिसीचे सादरीकरण केले. यावर बोलताना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, शहरात वाहनतळासाठी 89 आरक्षणे आहेत. त्यापैकी एकही आरक्षण ताब्यात नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. मग, पार्किंग पॉलिसीचा आग्रह कशासाठी धरला आहे. पैसे कमविण्यासाठी पालिकेकडे अनेक स्त्रोत आहेत. अगोदर सार्वजनिक व्यवस्था सक्षम करावी.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, महापालिका भवन परिसरात पार्किंगचे धोरण नाही. अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जातात. वाहनतळाची आरक्षणे ताब्यात घेतली नसताना प्रशासनाने कोणता अभ्यास करुन पॉलिसी आणली आहे. सुविधा नसताना पार्किग पॉलिसी नागरिकांवर लादू नये. कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून ‘पार्किंग’ पॉलिसी आणल्याचा, आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button