breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालयात पोस्टमार्टेम रखडल्याने नातेवाईक संतप्त

  • शवविच्छेदनास डाॅक्टर करताहेत विलंब, नातेवाईकांचा आरोप

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज (मंगळवार)  दहा मृतांचे शवविच्छेदन रखडल्याने मृतांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. शवविच्छेदनास डाॅक्टर विलंब करत असल्याने मृतदेह लांब पल्याला नेणाऱ्या नातेवाईंना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मृतांचा पंचनामा करण्यासाठी पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यातून एका टीमची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या टीमने काम करने बंधनकारक आहे. आज तळेगाव पोलिस ठाण्यातील टीमचा वायसीएम रुग्णालयात पंचनामा व इतर कामकाजाचा दिवस होता. मात्र ही टीम सकाळपासून रुग्णालयात पोहचलेली नाही. यामुळे खूनाच्या गुन्ह्यातील, अपघात आणि अकस्मात मरण पावलेल्या मृतांचे शवविच्छेदन 15 तासांपासून रखडले. यामुळे १० ते १२ मृतदेह शवगृहात रखडून पडले होते.

सध्या शवगृहात १२ मृतदेह आहेत. प्रत्येक मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी किमान एक तास लागतो. तसेच अजून काही शव शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात येत आहेत. यामुळे ज्या नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांचे शव गावी न्यायाचे आहे. त्यांनी पोलिसांच्या या गलथान कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button