breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’मध्ये डॉक्टरांनी घेतली बालकांची काळजी; सर्व बालके करोनामुक्त

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) एक हजार ३२९ महिलांची प्रसूती झाली असून, यापैकी २५५ महिलांना करोनाचा संसर्ग झाला होता. यापैकी ११ बाधित महिलांच्या नवजात बालकांनाही करोनाची लागण झाली होती. त्यातील नऊ जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. मात्र, दोन जणांना गंभीर लक्षणे होती. ‘वायसीएम’मधील डॉक्टरांनी या बालकांची काळजी घेतली आणि त्यांच्यावर उपचार केल्याने ही सर्व बालके करोनामुक्त झाली आहेत.

करोना काळात प्रसूतीदरम्यान करोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने अनेक रुग्णालयांत प्रसूतीसाठी महिलांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ‘वायसीएम’मध्ये प्रसूती विभाग सुरू करण्यात आला. ‘वायसीएम’मध्ये गेल्या सात महिन्यांत एकूण एक हजार ३२९ महिलांची प्रसूती करण्यात आली. यामध्ये २५५ महिला करोनाबाधित होत्या. या महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी ११ बालके बाधित झाली. त्यामुळे या बालकांवर विशेष लक्ष देण्यात आले. बाधित बालकांपैकी नऊ बालकांमध्ये सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना दोन ते तीन दिवसच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. दोन बालकांमध्ये गंभीर लक्षणे असल्याने त्यांना चौदा दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

बालकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊ नये, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, शारीरिक वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावेत यासाठी सर्व बालकांना आईचे दूध देण्यात येत होते. करोनाबाधित महिलेच्या प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ बाधित असतेच असे नाही. बाळाचा आणि आईचा संपर्क अधिक आला तर बाळाला करोनाची लागण होते, असे डॉक्टरांच्या निरीक्षणातून आढळून आल्याची माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आले.

उपचारांनंतर सर्व बालके करोनामुक्त झाली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले. या सर्व ११ बालकांना घरी सोडल्यानंतर त्यांच्या पालकांशी संवाद साधून बालकांच्या प्रकृतीविषयी माहिती घेण्यात येत आहे. या सर्व बालकांची प्रकृती उत्तम असून, करोनानंतर त्यांना कोणताही त्रास उद्‌भवलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

करोना कालावधीत जन्मलेल्या प्रत्येक बालकाची पहिल्या एका तासात करोना चाचणी करण्यात आली. त्यात एकूण ११ बालके बाधित आढळली होती. दोन बालकांमध्ये गंभीर लक्षणे होती. त्यांच्यावर ‘वायसीएम’च्या बालरोग विभागात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. उपचारांदरम्यान बाळांना नळीद्वारे आईचे दूध दिले जात होते. डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही बालके करोनामुक्त झाली.

  • डॉ. दीपाली अंबिके, बालरोगतज्ज्ञ वायसीएम
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button