breaking-newsपिंपरी / चिंचवड

वायसीएममध्ये आयसीयु उपलब्ध बेड्सबाबत सूचना फलक लावण्याची मागणी

पिंपरी –  काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने वाय सी एम मधील आय सी यु उपलब्ध बेड्स बाबत ठळक सूचना फलक लावण्याबाबत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व हॉस्पिटलात किती बेड उपलब्ध आहे किवां किती वेटिंग आहे याची यादी फलकावर ठळक पणे दर्शवण्याच्या निवेदन  आयुक्त श्रावण हर्डीकर यांना व मुख्य वैदकीय अधिकारी  मनोज एम देशमुख  यांना देण्यात आले.
वेळी मुख्य वैदकीय अधिकारी मनोज एम देशमुख  यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यावेळी  वैद्यकीय अधिकारी मनोज देशमुख यांनी वेटिंगची यादी नावासकट लावण्याचे आश्वासन दिले.  अशोक मंगल ह्यांनी प्रश्न केला कि आय सी यु ची क्षमता वाढवण्याची गरज असताना ते का वाढवण्यात येत नाही. वैदकीय अधिकारी  सांगितले नवीन आय सी यु उपकारांसह तयार आहे परंतु डॉक्टर्स आणि इतर सहकारी उपलब्ध नसल्यामुळे ही सुविधा वापराविना पडून आहे. ह्या शिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 50 जागा रिकामी असल्यामुळे आम्हाला उपलब्ध सुविधा पुरवण्यात कठीण जात आहे.
यावेळी मुख्य वैदकीय अधिकारी मनोज देशमुख निवेदन देताना पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, सचिव गुरुदेव वैराळ, सचिव राजेश नायर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे सचिव अशोक काळभोर, प्रदेश सचिव आयुष मंगल, मिताली चक्रवर्ती, जयश्री कननाइके, अमृत बहादूर उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button