‘वायसीएम’च्या डाॅक्टरांवर कारवाई करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/ht-pune_2a4594b0-ab89-11e7-696x447.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डाॅक्टरांच्या अक्षम्य चुकीमुळे एका 19 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घोडेगाव येथील गणेश गव्हाणे या तरुणाचा दुचाकीवरुन पडून रविवारी (दि.14) अपघात झाला. त्याला उपचारासाठी तातडीने वायसीएमएच् रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या हानवटीला मार लागला होता. रक्तश्राव होत होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगदाळे यांना रुग्णाचा रक्तश्राव जास्त होत असल्याचे सांगून स्वत: तपासणी करण्याची विनंती केली. परंतु, डॉक्टरांना बोलवित असल्याचे सांगत त्यांनी तपासणी केली नाही. कोणत्याही डॉक्टरांनी तप्तरता दाखविली नाही. गणेश याला वेळेत उपचार मिळाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेला आहे, असा आरोप यशवंत भोसले यांनी केला.