वाजपेयींच्या निधनाने देशात सात दिवसाचा दुखवटा जाहीर ; महापालिकेवरील ध्वज अर्ध्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pcmc-02.jpg)
पिंपरी – भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज (गुरुवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा म्हणजेच 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयावरील ध्वज अर्ध्यावर घेण्यात आला असून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. आज संध्याकाळी पाच वाजून मिनिटांनी त्यांचं निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी राजघाटवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयावरील ध्वज अर्ध्यावर घेण्यात आला असून सात दिवस ध्वज अर्ध्यावर राहणार आहे. महापालिकेतर्फे घेण्यात येणारे मनोरंजनाचे, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच भुमीपूनजने, उद्घाटनाचे कार्यक्रम देखील रद्द केले आहेत.