breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाजपेयींचे जीवन अत्यंत आदर्श, प्रेरणादायी व चारित्र्य संपन्न – खासदार अमर साबळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन अत्यंत आदर्श, प्रेरणादायी व चारित्र्य संपन्न होते. ते अजातशत्रू म्हणून सर्व भारतीयांना परीचित आहेत, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेल्या त्यांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे आदी उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले की, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशावर अखंड श्रध्दा ठेवून विचार धारेतून कार्यकर्त्यांवर संस्काराचे बिजारोपन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button