breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाघोलीत अल्पवयीन मुलीचा गर्भपात ; डॉक्टरसह ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल

पुणे – वाघोली येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरसह ११ व्यक्तींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली येथील वाघेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेने याप्रकाराबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वाघेश्वर नगर येथे घडली.  फिर्यादींनी दिलेल्या तक्रारी मध्ये सुभाष शिंदे, अंजना शिंदे,कार्तिक गुंजकर,अंबादास साळुके, पंडित डोंगरे, संतोष पवार,अनिल चौघुले, तुकाराम चौघुले, डॉ.अतुल जाधव, डॉ. ज्योती जाधव (सर्व. रा. वाघेश्वर नगर, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष शिंदे यांचा मेहुणा कार्तिक गंजकर याच्यासोबत पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर त्या पीडित मुलीस तीन महिन्याची गर्भवती ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन इतरांच्या मदतीने अतुल जाधव या डॉक्टरांकडे नेले व त्या डॉक्टर दांपत्याकडून त्या पीडित मुलीचा गर्भपात केला गेला. याप्रकरणी ११ जणांवर लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन दिवस उलटूनही कोणासही अटक करण्यात आले नसून पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button