breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाघेरे प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार बाळासाहेब महादू वाघेरे यांना जाहीर

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकू वाघेरे-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार यंदा संतसेवक  बाळासाहेब महादू वाघेरे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भिकू वाघेरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज सोमवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली.
  • प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, विलास व-हाडे, इंदाजी गोलांडे हणमंत वाघेरे आदी यावेळी उपस्थित होते. कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या 33 स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (दि. ६) सकाळी नऊ वाजता महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. युवा नेते पार्थ पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत नवहाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी साडेदहा वाजता  संतसेवक बाळासाहेब महादू वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नितीन नाणेकर यांच्या वतीने कै. अहिल्याबाई नाणेकर यांच्या स्मरणार्थ  श्रीमती पार्वतीबाई पुरुषोत्तम उर्फ अप्पासाहेब कर्पे यांना आदर्श माता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांनी दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button