वाकड, ताथवडे, पुनावळे भागासाठी स्वतंत्र करसंकलन कार्यालय सुरू करा – गटनेते राहूल कलाटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/A-Gallery_4.jpg)
पिंपरी/महाईन्यूज
वाकड, ताथवडे, पुनावळे येथील भौगोलिक परस्थितिचा आढावा घेऊन येथील नागरिकांसाठी स्वतंत्र करसंकलन कार्यालय करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाकड ताथवडे, पुनावळे हे परिसर नव्याने विकसित होत आहेत. वाकड-ताथवडे पुनावळे येथील नागरिकांना करविषयक कामकाजासाठी थेरगाव करसंकलन कार्यालयाशी सतत संपर्क करावा लागतो. थेरगाव करसंकलन कार्यालयावरती एक लाखांपेक्षा जास्त मिळकातींचा भार असल्याने नागरिकांचे गैर सोय होत आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामधील गट क्र.१ (कावेरी नगर ), गट क्र. ७ व ८ (वाकड), गट क्र.९ (पुनावळे) तसेच ताथवडे मधील सलग्न भाग ( गट क्र. १०,११ व १२) समाविष्ठ करून वाकड-ताथवडे पुनावळे किंवा भौगोलिक परस्थितिचा आढावा घेऊन येथील नागरिकांसाठी स्वतंत्र करसंकलन विभागीय कार्यालय कार्यन्वित करणे आवश्यक आहे. तरी वाकड-ताथवडे पुनावळे परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र कर संकलन कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.