breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
वल्लभनगर येथे मेट्रो कर्मचा-यांचे पगारासाठी पुन्हा उपोषण
– 75 कामगारांचे बेमुदत उपोषण, आजचा उपोषणाचा तिसरा दिवस
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पगार न दिल्याने वल्लभनगर येथे महामेट्रो प्रकल्प ठेकेदाराकडील कामगारांचे तीन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरु आहे. ठेकेदारांनी कामगाराचे वेतन देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतू, ठेकेदार कंपनीने सर्व कामगारांची फसवणूक केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वल्लभनगर येथील महामेट्रो रेल प्रोजेक्ट कार्यालय आहे. महामेट्रोचे ठेकेदार असलेल्या अल्फा इन्फ्राप्रोजेक्टने मेट्रो रेल्वे स्टेशनची कामे घेतली आहेत. कंपनीने कामगाराचे पगार न देताच अनेक कामगार कामावरुन काढले आहेत. त्यामुळे महामेट्रोच्या रेल्वे स्टेशनची कामे ठप्प आहेत.
अल्फा़ इन्फ्राप्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या पगारासाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले. या कंपनीने ७५ कामगारांना सहा महिन्यापासून पगार न देता केवळ एक दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच १ मे रोजी या कामगारांना उपोषण आंदोलन करायला लावले. ३ मे रोजी या कामगारांना ३५ लाख रु दिले, उर्वरीत थकित ९० लाख रुपये पंधरा दिवसात देण्याचे आवाश्वन दिले होते. पंधरा दिवस उलटूनही कामगारांची पगाराची रक्कम दिले नाही. त्यामुळे कामगारांनी पुन्हा उपोषण सुरू झाले आहे.
आज (सोमवार) उपोषणाचा तीसरा दिवस आहे. सबंधीत ठेकेदार, मेट्रो, प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे सबंधीत ठेकेदार, मेट्रोचे अधिकारी यांंच्यावर आर्थिक अफरातफर, विश्वासघात, फसवणूक केल्याबाबत पिपरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोदविण्यात येणार आहे. तसेच महामेट्रोचे अधिकारी, ठेकेदार कंपनीवर गुन्हे दाखल मागणी कामगारांनी केली आहे.