वंचित लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांचा बसपात प्रवेश
![Deprived Loksabche candidate Rahul Ovha Yancha Baspath admission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ovhal.jpg)
– प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश
पिंपरी । प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे २०१९ शिरूर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये ओव्हाळ यांना 38 हजार 70, मतदान मिळाले होते.
बहुजन समाजाला एकत्रित करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ओव्हाळ यांनी केले. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी, पुणे जिल्हा सचिव हरीश डोळस, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, मेहबूब शेख आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.