लोणावळ्यात धारदार शस्त्राने तरुणाचा खून
![लोणावळ्यात धारदार शस्त्राने तरुणाचा खून](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/crime-washim-25_20180589874.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर येथे राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शनिवारी (ता.०२) सकाळी उघडकीस आला. बिलाल फैयाज कुरेशी (वय-२८, वर्षे रा. इंद्रायणी नगर, टेबललँड चाळ, लोणावळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात सुल्ताना फैयाज कुरेशी ( रा. इंद्रायणी नगर, टेबललँड चाळ, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिलाल हा इंद्रायणी नगर येथील मटण मार्केटच्या बंद गाळ्यांमध्ये झोपण्यास जात असे. शुक्रवारी बिलाल हा बंद पडलेल्या भाजी मार्केट गाळा क्रमांक ३२ येथे झोपलेला असताना रात्री १० ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने बिलालचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी ही घटना समोर आली. खूनाची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कांवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.