breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकशाही पंधरवडा निमित्त नवोदीत मतदारांच्या नोंदणीबाबत जनजागृती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालाधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत नवोदीत मतदारांमध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबतचा कालबध्द कार्यक्रम महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे.

भारतीय संविधानातील ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीस २५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयाच्या अनुषंगाने मतदारांना मतदार जनजागृती संदर्भात लोकशाहीचे निरंतर शिक्षण देण्याचे अनुषंगाने लोकशाही पंधरवडा महापालिकेच्या वतीने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी सुचना दिलेल्या आहेत. सदर कालावधीत नवोदित मतदारांना मतदार यादीत नावे समाविष्ट करणेकामी प्रवृत्त करण्यासाठी व त्याचा प्रचार करणेकामी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर यांची ब्रॅन्ड एम्बेसिडर म्हणून नेमणूक केली आहे.

महापालिकेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये मनपा हद्दीतील १५ महाविद्यालयातील जे प्रथम १०० विद्यार्थी नवोदित मतदार म्हणून नाव नोंद करतील. त्यांचा प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात येईल. मनपा हद्दीतील महाविद्यालयांना २६ जानेवारी रोजी लोकशाही पंधरवडा दरम्यान रॅलीचे आयोजन करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या दिवशी प्रजासत्ताक दिना निमित्त महाविद्यालाच्या स्तरावर चर्चा सत्र व वक्तृत्व स्पर्धांचे व पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 2६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही निवडणूका व सुशासन या पंधरवड्याची जाहिरात व प्रसारण रेडीओ व एफएमवर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button