breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकन्यायालयात शेकडो खटले काढले निकाली

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पिंपरी दिवाणी व फौजदारी न्यायालय व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 8 डिसेंबर) पिंपरी न्यायालयात आणि आकुर्डी मनपा न्यायालयात आयोजित लोकअदालतीत शेकडो खटले निकाली काढण्यात आले.

आकुर्डी न्यायालयामध्ये  न्यायाधिश मे. माधुरी खनवे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार होते. आकुर्डी न्यायालय लोकन्यायालयाचे उदघाटन ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. सोपान माने यांच्या हस्ते झाले. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अंधश्रधा निर्मुलन समितीच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या अध्यक्षा अॅड. मनीषा महाजन होत्या. यावेळी पिंपरी न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायाधीश एस. जी. अग्रवाल, सहन्यायाधीश ए. यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी. भोसले, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड. गोरख कुंभार, महिला सचिव अॅड. स्मिता लांडे पाटील, सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड. महेश टेमगिरे, सदस्य अॅड. निलेश ठोकळ, अॅड. सुनील रानवडे, अॅड. पुनम राऊत, अॅड. केशव घोगरे, अॅड. विलास कुटे, अॅड. सुनील कड, अॅड. सुदाम साने, अॅड. सुरज खाडे, अॅड. पद्मावती पाटील, अॅड. निखील बोडके, अॅड. किशोर आरडकर, अॅड. गणेश राऊत, अॅड. संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते  एकनाथ पवार म्हणाले, न्यायालयाच्या बाबतीत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वपरीने मदत करेल. बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत असे आवाहन केले.

पॅनल परिक्षक म्हणून अॅड. सागर आडागळे, अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रतीक्षा खिल्लारी, अॅड. संगीता कुशालकर, अॅड. मनाली सावंत, अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. मोनिका गाढवे, अॅड. शिवाजी महानवर यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. गोरख कुंभार यांनी केले. तर, आभार अॅड. महिला सचिव अॅड. स्मिता लांडे यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button