breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लेटर पॅड, व्हिजीटिंग कार्ड खरेदीत भ्रष्टाचार; भांडार विभागावर दत्ता साने यांचा आरोप

पिंपरी – महापालिकेतील पदाधिका-यांसाठी लेटरपॅड, व्हिजिटींग कार्डची खरेदी थेट भांडार विभागातून केली जाते. मात्र, विरोधी पक्षनेते सत्ता साने यांची दहा लेटर पॅडची मागणी असताना त्यांना केवळ पाचच लेटर पॅड देण्यात आले. तसेच, व्हिजिटींग कार्डही मागणीनुसार दिले नाहीत. परंतु, प्रशासन आपली सूच मान्य करायला तयार नाही. यावरून लेटर पॅड आणि व्हिजिटींग कार्ड खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे.

 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षाचा पदभार हाती घेतला. त्यांनी 18 मे रोजी मराठी, इंग्रजी लेटर पॅड, मराठी- इंग्रजी व्हिजिटींग कार्ड, विडो पाकीटे, साधी पाकीटे, वैद्यकीय सवलतीची शिफारस पत्रे व साधी शिफासर पत्रे आदी स्टेशनरींची मागणी भांडार विभागाकडे केली होती. त्यानुसार, भांडार विभागाने तातडीने 8 जून रोजी मराठी लेटर पॅडचे पाच नग व व्हिजिटींग कॉर्डचे दोन बॉक्स दिले. परंतु, कार्डमध्ये चुका असल्याने  भांडार विभागास दुरुस्ती करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शिल्लक स्टेशनरीबाबत पाठपुरावा केला असता निविदाची कालमर्यादा संपली आहे. नवीन निविदा काढल्यानंतर स्टेशनरी पुरविण्यात येईल, असे भांडार विभागाकडून सांगण्यात आले.

त्यामुळे भांडार विभागाच्या कर्मचा-यांनी दहा ऐवजी पाच लेटरपॅड आणून दिले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर आम्ही तुम्हाला दहा लेटरपॅड आणून दिलेले आहेत. तशी रजिस्टरला सही घेतल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष पाचच लेटरपॅड देण्यात आल्याचे आढळून आले. तसेच, व्हिजिटींग कार्डमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे.  यामध्ये घोटाळा झाल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे या विभागाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button