breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लाभार्थी महिलांना महापालिकेकडून करोडो रुपयांची मदत

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना, पहिल्या मुलीवर किंवा दुसरी मुलगी असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलांना तसेच परदेशात उच्चशिक्षण घेणा-या मुलींना 1 एप्रिल 2020 ते 1 जानेवारी 2021 दरम्यान, 1 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांचे अर्थसहाय देण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थसहाय देणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक घटकातील नागरिकांना महापालिकेच्या योजनांचा लाभ घेता येतो. त्यानुसार नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विशेष महिलांना करोडो रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय योजनेंतर्गत 1 हजार 272 महिला अर्जदारांना एकूण 1 कोटी 27 लाख 20  हजार रुपयांचे अर्थसहाय देण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओच्या माध्यमातून पहिल्या किंवा दुस-या मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणा-या 24 महिला अर्जदारांना 3 लाख रुपयांचे अर्थसहाय देण्यात आले.

प्रमोद महाजन योजनेंतर्गत परदेशात उच्चशिक्षण घेणा-या 6 युवतींना एकूण 9 लाखांचे अर्थसहाय करण्यात आले. पालिकेने या योजनांच्या माध्यमातून लाभार्थी अर्जदारांना एकूण 1 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांचे अर्थसहाय दिले आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button