breaking-newsपिंपरी / चिंचवड
लाडशाखीय वाणी समाजाचा रविवारी राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लाडशाखीय वाणी समाजाच्या वधू वरांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा रविवारी (दि. 9 डिसेंबर) आकुर्डीतील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन (खंडोबा माळ) येथे सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे हे चौथे वर्ष आहे. आगाऊ नोंदणी केलेल्या व ऐनवेळी येणा-या वधु-वर व पालकांनी बायोडाटासह उपस्थित रहावे, असे आवाहन लाडशाखीय वाणी समाज पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.