breaking-newsपिंपरी / चिंचवड
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
![NCRB report Mumbai at second in crime against women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/crime-1-1.jpg)
निगडी – लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने एका २३ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. ही धक्कादायक घटना जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत निगडी ओटास्कीम आणि रावेत येथील मयुर लॉजवर घडली.
याप्रकरणी पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश भिमराव वाघमोडे (वय २९, रा. मिलींदनगर, सेक्टर क्र.२२, ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी आणि आरोपी राजेश यांचे प्रेमसंबंध होते. जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून निगडी येथील त्याच्या राहत्या घरी तसेच रावेत येथील मयुर लॉजवर नेऊन बलात्कार केला. राजेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.