Breaking-newsपिंपरी / चिंचवड
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/rape-victim-new_20171131721.jpg)
पिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन केला. इच्छा नसतानाही तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पीडिता गरोदर राहिली. पिंपळे सौदागर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी १६ वर्षे ५ महिने वयाच्या पीडितेने फिर्याद दिली आहे. फियार्दी अल्पवयीन मुलगी सात ते आठ महिन्यांपूर्वी पिंपळे सौदागर येथील एका पुलाखालून कामावर येत-जात होती. त्यावेळी तिच्या सोबत ओळख वाढवून आरोपीने तिला विश्वासात घेऊन अज्ञातस्थळी नेले. तुज्यासोबत मी लग्न करणार आहे, असा तिला विश्वास दाखविला. तिची इच्छा नसतानाही व ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.