रेड झोन हद्दीतील नागरिकांना तत्काळ सुविधा बंद करु नये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/3shravan_hardikar_datta_sane_final.jpg)
- माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रेड झोनच्या भागात नागरी सुविधा बंद करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामे प्रशासनाला थांबविता आलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेने नागरी सुविधा बंद करु नयेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बुधवारी (दि.31) दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे थांबविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची होती. मात्र, प्रशासनाला ती बांधकामे थांबविता आली नाहीत. आपली चुक झाकण्यासाठी नागरी सुविधा न देण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर देत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. नियमितपणे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा न पुरविल्यास आंदोलनाचा इशारा माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.
भाजपचे पदाधिकारी न्यायालयात गेल्याने रेड झोनची हद्द पालिका प्रशासनाला सन 2008 ला समजली आहे. नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे हे पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे रेड झोन परिसरात सर्व प्रकाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.