breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेचे बुलडोझर

नव्याने बांधण्यात येणा-या पाच बांधकामे जमिनदोस्त

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘नो डेव्हलमेंट झोन’ परिसरात प्लाॅटिंग व्यवसाय जोरदार सुरु आहे. त्या रेडझोन परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरु आहे. वडमुखवाडी परिसरातील पाच बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आली.

वडमुखवाडी येथील रेडझोन हद्दीत बांधकाम केलेल्या पाच आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली. एकूण 3565 चाैरस फूट बांधकाम पाडण्यात आले. यामध्ये विजया डोंगरे, संगिता इमडे, रमेश मोहिते, दिलीप देवरे, महादेव चव्हाण याच्या घरांवर कारवाई करण्यात आली.

सदरील कारवाई पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार व शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या पथकाने केली. यावेळी मनपा कर्मचारी, पोलिस उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button