breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘रिपाईं’कडून शिवसेनेच्या उमेदवारीवर आक्षेप, ‘युतीतून पिंपरीवर आमचाच दावा’

  • रिपाईचे शहराध्यक्ष सुरेश निकळजे यांची भूमिका
  • चाबुकस्वारांची उमेदवारी रिपाईला अमान्य?

पिंपरी, महाईन्यूज

आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे. शिवसेना पक्ष महायुतीत असला तरी अद्याप महायुतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. पिंपरी विधानसभा मतदार संघावर आमचाच दावा आहे. तो कायम राहणार असल्याचे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी ‘महाईन्यूज’ला सांगितले. त्यामुळे पिंपरीच्या जागेवरून शिवसेना विरुध्द रिपाईचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या राज्यभरातील विद्यमान आमदारांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समजते. त्यातच पिंपरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीच्या वाटाघाटीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सोडली जाणारी पिंपरीची जागा शिवसेनेने स्वतःकडे ठेवली आहे. यामुळे रिपाईच्या इच्छुक उमेदवारावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदार संघावर आठवले यांच्या रिपाईचा दावा कायम असतो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रिपाईने ही जागा लढविली होती. त्यात शिवसेनेचे उमेदवार एड. चाबुकस्वार यांचा विजय झाला. आता भाजप-शिवसेना-रिपाईसह अन्य घटक पक्षांची युती असल्याचे चित्र दिसत आहे. युतीची घोषणा झाली नसताना शिवसेनेने या विधानसभा निवडणुकीत आमदार चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आजच त्यांची उमेदवारी पक्षाकडून घोषीत झाली आहे. त्यामुळे रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. जर अशा प्रकारे मित्रपक्षाकडून उमेदवारी जाहीर होत असेल तर महायुती तुटणार असल्याचे हे संकेत आहेत, अशी रिपाईच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

पिंपरी मतदार संघावर आमचाच हक्क
भाजप-शिवसेना-रिपाई यांच्या महायुतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. आमदार एड. गौतम चाबुकस्वार यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे. ते युतीचे उमेदवार आहेत, असे मानले जात नाही. जोपर्यंत युतीची घोषणा होत नाही. तोपर्यंत आम्हाला उमेदवारी मिळण्याची आपेक्षा कायम आहे. नक्कीच हा मतदार संघ आम्हाला सुटेल यात शंका नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. त्यानुसार कोणाचे काम करायचे हे ठरवले जाईल, अशी माहिती रिपाईचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button