breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिक्षा टॅक्सी संघटनेची दिल्लीत धडक, केंद्रीय मंत्री जितेंद्र शिंग यांच्याशी बातचीत 

पिंपरी – रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र शिंग यांनी नुकताच देशभरातील रिक्षा टॅक्सी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. देशभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. शिंग यांनी दिले.

 

यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे नेते राजेंद्र सोनी, जांबू काश्मीर रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अचल शिंग, अखिल मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष मधुकर थोरात, नवी मुंबई कृती समितीने नेते मारुती कोंडे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे मोशविर  लोकरे, दीपक दासगाय, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

 

रिक्षा विमा हप्त्यात (इनसोरेन्स ) झालेली वाढ , रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, रेल्वे स्टेशनवर रिक्षा टॅक्सी चालकांची जागा भांडवलदार कंपन्यांना भाड्याने दिली जात आहे, ओला उबर, मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे, बॅटरी अपरेड रिक्षा यासह विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button