रिक्षा चालक मालकांच्या हितासाठी कल्याणकारी महामंडळ गठीत होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190709-WA0132.jpg)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
- रिक्षा चालक मालक संघटनेच्या बैठकीत निर्णय
पिंपरी, (महाईन्यूज) – रिक्षा चालक मालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी कल्याणकारी महामंडळ लवकरच गठीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
रक्षा चालक मालकांची बैठक मुख्यमंत्री दालनात संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीला रिक्षा संघटनेच्या वतीने शशांक राव, बाबा कांबळे, विलास भालेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रिक्षा चालक मालकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शासकीय समिती येत्या आठ दिवसांत गठित करण्यात येईल. मुक्त परवाना बंद करण्याबाबत आणि भाडेवाडीचे सूत्र ठरवणारी हकीम कमिटीच्या शिफारशी आमलात आणल्या जातील. खटाव कमिटीच्या शिफारशी लवकरच आमलात आणल्या जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
यामुळे रिक्षा संघटनांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले आहेत.