राहत्या घरात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/hanging_3229.jpg)
पिंपरी – आजाराला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी फळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आला. कॉन्स्टेबल हे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जयंत कृष्णराव कसबे (वय 50, रा. देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे मागील दहा वर्षांपासून मानसिक आजाराशी झुंजत होते. मागील काही दिवसात या आजाराने जास्तच डोके वर काढल्याने त्यांनी कामावरून सुट्टी घेतली. मागील काही दिवसांपासून कसबे सुट्टीवर होते. शनिवारी (दि. 25) रात्री जेवण करून ते झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना जागे करण्यासाठी नातेवाईक त्यांच्या खोलीत गेले असता छताच्या पंख्याला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.