breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घर नावावर करण्यासाठी पतीकडून पत्नीचा छळ, हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्वतःच्या घरात राहणा-या पत्नीकडून घरभाडे उकळण्याची शक्कल लडवून तो फ्लॅट आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीचा छळ करणा-या पतीच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार नुकताच निदर्शनास आला आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती अभिजित नीलकंठ जेधे (रा. मेगा पॉलीस सोसायटी, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित आपल्या पत्नीसोबत हिंजवडी येथील मेगा पॉलीस या ठिकाणी राहतो. राहता फ्लॅट पत्नीच्या नावे केलेला आहे. पीडित महिला हिंजवडी येथे नोकरी करते. दोघेही एकाच घरात राहतात. दरम्यान, अभिजितने राहता फ्लॅट स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्नीकडे तगादा लावला. वरून त्या घरात राहाण्याचे पत्नीने भाडे द्यावे, अशी मागणी केली. त्याला विरोध केला असता अभिजितने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, वाद टोकाला गेल्याने पत्नीने अभिजितच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button