breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राहण्यायोग्य शहर’ सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची माहिती संकलन सुरु

आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या विभागप्रमुखांना सूचना, झोनल अधिका-याचं नियुक्ती

पिंपरी |महाईन्यूज|

केंद्र सरकारच्या राहण्यायोग्य शहर सर्वेक्षण लवकरच सुरु होणार आहे. याकरिता शहरातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय यासह विविध माहिती संकलन करण्यात येणार आहे. तसेच त्या-त्या विभाग प्रमुखांची नियुक्त करण्यात आले असून त्याच्याकडून योग्य ती माहिती संकलित करावी, अशा सुचना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज ( बुधवारी) विभाग प्रमुखाची बैठक पार पडली. त्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या वतीने राहण्यायोग्य शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा ६९ क्रमांक आला होता. त्यावेळी अपयशाचे सर्व खापर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर फोडले होते. मात्र, या अपयशाची कारणमीमांसा करून कोणामुळे अपयश आले, ही जबाबदारी निश्चित करून कडक केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या राहण्यायोग्य शहर सर्व्हेक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी योग्य व अचूक नियोजन करण्याचे ठरविले आहे.

पिंपरी चिंचवड हे देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, विस्तीर्ण रस्ते, डोळे दिपविणारे उड्डाणपूल, हरितनगरी, उद्याननगरी म्हणून उद्योगनगरीचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीकरणाचाही वेग मोठा आहे. सार्वजनिक मूलभूत सुविधा या सर्वच बाबतींत पुण्याला उजवे असणारे शहर राहण्यायोग्य नाही, ही आश्चर्याची, चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.

गतवर्षीच्या सर्व्हेक्षणात औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य या चार स्तंभांवर सर्वेक्षण, तसेच गव्हर्नन्स, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, गृहनिर्माण, मोकळ्या जागा, संमिश्र जागेचा वापर, वीजपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, मैला सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण अशा विविध विभागांनुसार माहिती विचारली होती. त्यात आता बदल झाला असून पोलिस, वाहतूक, रस्ते, आरोग्य, वैद्यकीय, पायाभूत सोयी-सुविधा आणि नागरिकांकडून प्रश्नावली भरुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील सर्व माहितीचे संकलन पंधरा दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. त्या माहितीवर अतिरिक्त आयुक्तांकडून छाननी करुन आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात तरी राहण्यायोग्य शहरात पिंपरी चिंचवडचा समावेश होणार का? या पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button