breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांचे संचलन

पिंपरी |महाईन्यूज|

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात संचलन केले. देशभक्तिपर गीतांच्या संगीतावर हे संचलन करण्यात आले.

मुंबई-पुणे महामार्गावरील आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून सुरू झाले. पुढे काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी चौक येथून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर संचलनाचा समारोप झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दोन; तर राज्य राखीव पोलिस दलाचे एक, असे एकूण तीन प्लाटून होते. तसेच, बॅण्ड पथकानेही सहभाग घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास खंडोबा माळ चौकातून संचलनाला सुरुवात झाली. सव्वा पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संचलनाचा समारोप झाला. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button