breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवकने ठोकले पुण्यातील ‘एम्प्लॉयमेंट’ कार्यालयाला टाळे 

  • भाजपने सुशिक्षीत बेरोजगारांची केली फसवणूक
  • ‘एम्प्लॉयमेंट’ प्रशासनाच्या विरोधात उसळला संताप

पिंपरी, (महाईन्यूज) – केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर पडला असून त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. उच्चशिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. याच्या निषेधार्त आज पुण्यातील एम्प्लॉयमेंट कार्यालयाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने टाळे ठोकण्यात आले.

भाजप सरकारच्या कार्यकाळात २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्के झाला आहे. यावरून भावनिक तसेच अस्मितेच्या मुद्यांवर राजकारण करणा-या मोदी सरकारने नवीन नोकऱ्या, उद्योग यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, हे लक्षात येते. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन सरकारने दिले. त्याची पूर्तता आजतागायत केली नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळी आहे. जिल्हा मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवस्थित माहिती दिली जात नाही. ऑनलाईन अर्ज किचकट पद्धतीचा आहे. रोजगार कार्ड काढून काही उपयोग नाही. नवीन उद्योजकांना कोणतेही सहकार्य मिळत नाही, फक्त कौशल्य विकास करून रोजगारच नसेल तर कार्यालय तरी कशासाठी चालू ठेवायचे?, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील एम्पॉलयमेंट ऑफीसला आज टाळे ठोकण्यात आले. यावेळी पुणे शहर अध्यक्ष राकेश कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, प्रदेश सरचिणीस अभिषेक बोके, प्रदेश संघटक विशाल काळभोर, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, समीर चांदेरे, अजय आवटे, जिल्हा अध्यक्ष सातार तेजस शिंदे, मनोज पाचपुते, किशोर कांबळे, अमोल ननावरे, विशाल नाटेकर, महेश हांडे, अच्युत लांडगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button