breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा, कारण अद्याप गुलदस्त्यात

पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी |

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात झाली. त्यातच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे.

अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button