breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागासाठी अंदाजपत्रकात सत्ताधा-यांकडून जुजबी तरतूद – राजू मिसाळ

पिंपरी / महाईन्यूज

मागील चार वर्षापासून महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या पदाधिका-यांनी पक्षीय राजकारण करीत राष्ट्रवादीचे ज्या प्रभागामध्ये जास्त नगरसदस्य निवडून आले आहेत. त्या प्रभागामध्ये जाणून बजून अंदाजपत्रकामध्ये विकास कामांसाठी जुजबी तरतूद करीत आले आहेत. असा आरोप विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.

२०२१-२२ चा अर्थसंकल्प नुकताच आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीसमोर सादर केला आहे. स्थायी समितीने त्यात काही बदल सुचवून महापालिकेकडे मंजुरीसाठी शिफारस केलेली आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसदस्यांना त्यांच्या प्रभागात विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा. त्याच प्रमाणे त्यांच्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे व प्रस्तावित विकासकामे यांच्या आयुक्त व वरीष्ठ अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी नगरसदस्य व आयुक्त आणि  मनपाचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासोबत चिंचवड स्टेशन येथील अँटो क्लस्टर येथे आज मिटींग घेण्यात आली.

बैठकीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या, प्रलंबित व प्रस्तावित विकासकामे व त्यासाठी लागणारा निधी याबाबत सविस्तर चर्चा केली. आयुक्त पाटील यांनी सर्वांच्या समस्या एकूण घेऊन त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. प्राधान्याने पाणी पुरवठ्याची समस्या सोडवून पुढील सात आठ महिन्यात दररोज पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शहरातील नद्या दोन वर्षात स्वच्छ करणार, जलपर्णीची समस्या कायमची निकालात काढणार, मनपाची प्रत्येक निविदा पारदर्शीपणे काढणार असल्याचे सांगितले. तसेच, लोकांच्या पैशाचा योग्य विनियोग करण्यात येईल, अनावश्यक कामे थांबविली जातील असेही आयुक्तांनी सांगितल्याचे राजू मिसाळ म्हणाले.

बैठकीत विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, स्थायीचे माजी सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर, स्वाती काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. तर, प्रशासन विभागाकडून आयुक्त, अतिरीक्त आयुक्त क्र. १ व ३ तसेच शहर अभियंता उपस्थित होते, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button