राष्ट्रवादीची विकास कामे लोकांपर्यंत पोहोचविल्यास यशापासून कोणीच रोखू शकणार नाही – पार्थ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/55448543_2360300290661342_190702878724194304_n.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दादांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकास प्रकल्प राबवून शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. परंतु, राजकीय विरोधकांनी चुकीचे आरोप केल्यामुळे महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. आपण केलेली कामे योग्य पध्दतीने लोकांपर्यंत पोहोचविल्यास पुन्हा आपल्याला यश मिळविण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिंपळे सौदागर येथे व्यक्त केला.
याठिकाणी सोसायटी, कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर नगरसेवक नाना काटे आणि शितल काटे यांनी सभेचे रविवारी (दि. 24) आयोजन केले होते. त्यावेळी उमेदवार पार्थ पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, विविध सोसायटीचे चेअरमन, खजिनदार आणि नागरिक उपस्थित होते.
पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. रविवारी त्यांनी पिंपळे सौदागर येथील शिवार चौक परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर रहाटणी येथील काही सोसायट्यांमधील पदाधिका-यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.