breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीची नामुष्की : शहराध्यक्षाच्या भूमिकेला चक्क आमदारांचा विरोध

  • पदाधिका-यांची डबलढोलकी भूमिका पक्षाच्या आंगलट
  • चूक लक्षात येताच अनुभवी आमदारांनी घेतली माघार


पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ठेकेदारांची 208 कोटींची बिले मंजूर केल्यानंतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि आमदार आण्णा बनसोडे यांनी चक्क एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत. दोघांच्या भूमिका पक्षाच्या आंगलट येणार असल्याचे समजताच आमदार बनसोडे यांनी तातडीने मागार घेतली आहे. यातून पक्षातील पदाधिका-यांमध्ये कसलाही समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पदाधिका-यांच्या अशा डबलढोलकी वागण्यामुळे राष्ट्रवादीच्या बदनामीचे प्रदर्शन लोकांपुढे मांडले गेले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गतवर्षी 690 विकासकामे मार्गी लागली. या कामापोटी ठेकेदारांची महापालिकेने 208 कोटी 40 लाख रुपयांची बिले अदा करणे अपेक्षित होते. मार्च 2020 दरम्यान लॉकडाऊन जाहिर झाल्यामुळे ही बिले थकीत राहिली. त्यावर 3 जून 2020 रोजी बिले अदा करण्याचा आदेश निघाला. तरी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बिले अदा करण्यासाठी एक महिन्याचा वेळ लावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन नाणेकर यांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे विषय सादर केला. त्यावर 10 जुलै रोजी 208 कोटी 40 लाख रुपयांची बिले अदा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यावर अध्यक्ष वाघेरे पाटलांनी या विषयाचे श्रेय लाटण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मध्यस्तीने हा विषय मार्गी लागल्याचा दावा केला. वास्तविकता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने आयुक्तांना यासंदर्भात आदेश देणे साहजीक आहे. मात्र, श्रेय लाटण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने राष्ट्रवादीने ठेकेदारांसोबत हातमिळवणी केली की काय ?, असा संशय निर्माण होत आहे.

त्यावर राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी वाघेरे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आयुक्तांनी 208 कोटी 40 लाख रुपयांची बिले ठेकेदारांना कोणत्या आधारावर अदा केली, याचा त्यांनी खुलासा मागितला आहे. ज्या कामासाठी ही बिले अदा केली, ती कामे प्रत्यक्षात झाली की नाही ?, असा जाब बनसोडे यांनी विचारला आहे. कोरोनाच्या काळात लोकहीत पाहण्याऐवजी ठेकेदारांचे हीत पाहिले जात आहे. भाजप आणि आयुक्त ठेकेदारांची बिले अदा करवून देत आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या रक्कमेची बिले काढण्यामागे कोणाचे हीत साधले जात आहे. जोपर्यंत याबाबत खुलासा येत नाही, तोपर्यंत ही बिले अदा करण्यात येऊ नयेत. अन्यथा राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा बनसोडे यांनी दिला आहे. याबाबतचा मजकूर बनसोडे यांनी व्हॉट्सअपद्वारे डिजीटल मीडियापर्यंत पोहोचविला होता. काही माध्यमांनी तर त्याला प्रसिध्दी देऊन न्यूजलिंक सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या. मात्र, बनसोडे यांनी न्यूज मीडियाच्या प्रतिनिधींना तातडीने या बातम्या डिलीट करण्याची विनंती केली. त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे माध्यमांच्या ग्रुपवर शेअर केलेला मजकुरही त्वरीत टिलीट करण्यात आला. एकंदरीत बनसोडे आणि वाघेरे पाटलांची भूमिका एकमेकांच्या विरोधात असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते. यामुळे राष्ट्रवादीची पुरती बदनामी होताना दिसत आहे.

बातमी माघारी घेण्याची शहरातील पहिली नामुष्की

पिंपरी-चिंचवड शहरात बातमी प्रसिध्द करायला द्यायची आणि ती लागलीच डिलीट करायला लावायची हा प्रकार पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार राष्ट्रवादीच्या अनुभवी आमदाराच्या हातून घडणे अत्यंत चुकीचे आहे. एखादा विषय हाती घेतल्यानंतर तो तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे लोकोपयोगी लोकप्रतिनिधीचे लक्षण मानले जाते. मात्र, आजची बातमी माघारी घेण्याची शहरातील पहिली नामुष्की राष्ट्रवादीवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button