breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादीकडून निव्वळ स्वार्थाचे राजकारण – विजय शिवतारे

पिंपरी –  अजित पवार यांना पहिल्यांदा खासदारकीला निवडून देऊन 1991 मध्ये बारामतीने केलेली चूक पुन्हा मावळने करू नये, भ्रष्टाचाराचा कळस करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिल्याने महाराष्ट्र आम्हाला कधीही माफ करणार नाही. आता त्यांच्या मुलाला निवडून देऊन मावळवासीयांनी पुन्हा ती चूक करू नये, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले

शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.  खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

शिवसेनेच्या उपनेत्या,  प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आदी उपस्थित होते.

डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या की, मावळची जनता साधी भोळी नाही. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये पराभूत केले. आता मावळात त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका त्यांनी केली.

उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, ”ही निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. राष्ट्रवादीचे उरण, पनवेल डिपॉझिट जप्त झाले होते. कर्जतमध्ये शिवसेना आमदार आहे. मावळने सर्वात जास्त आघाडी दिली होती. चिंचवडमध्ये भाजपचा तर पिंपरीत शिवसेना आमदार आहे.  संपूर्ण मतदारसंघावर युतीचे प्राबल्य आहे. त्यामुळे आपण शंभर टक्के विजयी होणार असून ते सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय असो की मतदारसंघातील समस्या आपण लोकसभेत मांडल्या. त्यासाठी पाठपुरावा केला आहे. काम करणा-या सच्च्या कार्यकर्त्याला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे स्वागत केले. तर, गणेश भेगडे यांनी प्रास्ताविक केले. तर, यदुनाथ चोरगे यांनी  सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button