breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राम मंदिरासाठी चिखलीतील साई मंदिरात शहर शिवसेनेची महाआरती, महिलांचा मोठा सहभाग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चिखलीच्या साने चौकातील साई मंदिरात महाआरती करण्यात आली. पारंपरिक पेहराव केलेल्या पाचशे महाराष्ट्रीयन, बंगाली, राजस्थानी, गुजराती महिलांनी महाआरती करत रामनामाचा जप केला. तर, बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांनीही हाती पंचपाळ घेत महाआरतीत सहभाग घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला. घंटानादाने सानेचौक परिसर दुमदुमुन गेला.

राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे कुटुंबासह आज सकाळी अयोध्येला गेले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनांसह शेकडो भाविकांनी महाआरती केली. तत्पुर्वी, कृष्ण मंदिर ते साई मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राम, लक्ष्मण, सीता अशी वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभा यात्रेत अग्रभागी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीतील वारक-यांनी टाळ मृदुंगाचा निनाद अन् मुखी विठ्ठल विठ्ठल नामाचा अखंड गजर केला.

गळ्यामध्ये तुळशी माळ, कपाळावर केशरी गंध, हातात टाळ-चिपळ्या, मुखी विठूरायाचा जप अन् मनात रामनामाचे स्मरण करणा-या वैष्णवांच्या मांदीयाळीने वातावरण भारावून गेले. शेकडो भाविकांनी हा सोहळा डोळ्यात साठविला. भोसरी पंचक्रोशीतून अनेक भाविक दुचाकी रॅलीने शोभायात्रेत सहभागी झाले होते. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे, शिवसेना विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी या महाआरतीचे संयोजन केले. महिला आघाडी संपर्क संघटिका वैशाली सूर्यवंशी, सुशीला पवार, शशिकला उभे, स्मिता जगदाळे, रुपाली आल्हाट यादेखील उपस्थित होत्या.

या महाआरतीसाठी मोरेवस्ती शाखेचे सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी, सतीश दिसले व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button