breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर!

मुंबई – बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत बालभारतीच्या संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीनुसार सभागृहात संख्यावाचनाचे धडे दिले होते. यालाच मुख्यमंत्र्यांनी छगन कमळ बघ, शरद गवत आण, अशा शब्दात जशास तसं उत्तर दिलं होतं.

त्यानंतर आता राष्ट्रवादीनंही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.राष्ट्रवादीने एक फोटो शेअर करत भाजपला ‘जोड्या लावा’चा स्वाध्याय दिला आहे. तसेच बालिश भारतीचा नवा धडा, पुढील स्वाध्याय धडाधडा सोडवा, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पुस्तकात शैक्षणिक 2019-20 या वर्षापासून महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलानुसार विद्यार्थी आता संख्यावाचन करताना, अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, बत्तीस ऐवजी तीन दोन अशी नवी पद्धत अमलात आणली आहे. यावरुन काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारची खिल्ली उडवली होती. आता मोबाईल नंबर कसा बोलायचा 9892 कसं म्हणायचं.. 90 वर 8, 90 वर 2, अहो हे काय चाललंय..? भावी पिढीचं नुकसान, वाटोळं करतोय. आता मंत्री बावनकुळे कसं म्हणायचं?
50 वर 2 कुळे असं म्हणायचं ???
विसपुते… यांना 20 वर शून्य पुते??? फडणवीस यांना फडण 20 वर शून्य…या अशी हाक मारायची का आम्ही? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

त्यानंतर संख्यावाचनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली होती. बोलण्यात सुलभता यावी म्हणून संख्यावाचनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
– दादा कमळ बघ
– छगन कमळ बघ
– हसन झटकन उठ
– शरद गवत आण
पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात हे उतारे आहेत. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

त्यावर राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.राष्ट्रवादीने एक फोटो शेअर करत भाजपला ‘जोड्या लावा’चा स्वाध्याय दिला आहे. तसेच बालिश भारतीचा नवा धडा, पुढील स्वाध्याय धडाधडा सोडवा, असं कॅप्शन दिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button